फिल्म इंडस्ट्री आणि सत्य परिस्थिती
खरंतर चित्रपट क्षेत्राबद्दल नागरिकांना जे काही कळते ते फक्त पेपर, मासिक आणि टीव्ही वर दाखविल्या जाणारे त्यांचे सोहळे यातूनच. तो झगमगाट बघून इथे काम करणारा म्हणजे श्रीमंत असणार हा समज सगळ्यांचा असतो. पण सत्य खूप वेगळेच आहे. अमीर खान याने एकदा एका मुलाखतदरम्यान सांगितले की 100 कोटी चित्रपटाने कमविले हे किती खोटे आहे. एक चित्रपट मोठ्या कलाकार आणि तंत्रज्ञ ह्यांना घेवून केला तर खर्च कमीतकमी 70 कोटी येतो. सर्व प्रकारच्या जाहिराती चित्रपटाचा प्रचार करण्यासाठी संपूर्ण देशात पुन्हा 70 कोटी कमीतकमी खर्च होतात म्हणजे चित्रपटाचा खर्च होतो 140 कोटी मग चित्रपटाने कसे काय कमविले. उलट छोटे बजेटचे चित्रपट 1 करोड का होईना पण कमावतात. पण 100 कोटी कमाई हे सगळे खोटे आहे. आता ह्यात काम करणारे कलाकार व तंत्रज्ञ ह्यांना ह्या झगमगाट राहण्यासाठी खर्च सुद्धा तसाच करावा लागतो. म्हणजे कमाई 10 लाख पण खर्च 20 लाख ही अनेकांची परिस्थिती असते. म्हणजे इथे येणारे कर्जबाजारी जास्त होतात हे खरे आहे बाकी फक्त दिखावा आहे. अनेक कलाकार आणि तंत्रज्ञ यांची म्हातारपणी जी दुर्दशा होते त्याला तेच कारण आहे. त्यामुळेच ह्या व्यवसायाल...